Cincopa Gallery

...

Tuesday, 5 May 2015

Learn Computer in early age

लहानपणापासूनच मुलांना कंम्प्युटर शिकवा.

पालक बंधू:भगीनींनो,
     आज प्रत्येकाला दोनच अपत्य आहेत. आणि त्यांची  काळजी आपण घेतच असतो. दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी कोर्स शोधून काढतो. रिकामे उन्हात फिरण्यापेक्षा काहीतरी शिकून जाईल असा विचार करुन आपण तबला वादन, हार्मोनियम, गायन क्लास, डान्स क्लास असे विविध क्लासेस आपण सुट्यांमध्ये लावतो.हे सर्व आपण मुलगा/मुलगी 10 वी परीक्षा देतो तापर्यंत करतो. आणि 10 ची परीक्षा संपल्यानंतर मात्र कंम्प्युटर कोर्सेसमध्ये या मुलांची गर्दी वाढते. जो तो एम.एस.सी.आय.टी. करायची असे म्हणतो.
      मित्राांनो, सध्याचं युग कंम्प्युटरचे युग आहे म्हणूून कंम्प्युटर कोर्सेस केलेच पाहिजेत. परंतु फक्त कोर्सेस नको तर त्या कोर्सचे स्कील/कौशल्य त्याला हस्तगत झाले पाहिजे. 10 वी नंतर एक दोन महिने मिळतात. नंतर 11 वी चे अडमिशन, विविध Documents गोळा करण्याची गर्दी या सर्व बाबींमुळे दोन महिने केलेला कोर्स कधीच डोक्यातून उडून जातो हे त्यालाही कळत नाही. खरं म्हणजे, कोणत्याही नविन गोष्टींचे कौशल्य एक-दोन महिन्यात हस्तगत होत नाही. यासाठी उपाय काय? मला वाटते की मुलगा जेव्हा पाचवीत जातो तेव्हापासून रोज एक तास (फक्त्त एकच तास) कॉम्प्युटरचा नियमित कोर्स केला तर 10 वी च्या सुट्या येईपर्यंत मुलगा कॉम्प्युटरची एखादी लॅग्वेज (Language) भाषा शिकून जाईल.आणि कमी वयात तो सॉफ्टवेअर ची निर्मिती करु शकेल. 
    बहुसंख्य पालक मला भेटतात आणि सांगतात की, आमच्या घरी कॉम्प्युटर आहे परंतु आमचा मुलगा लहान आहे आणि तो फक्त गेमच खेळत राहतो म्हणून आम्ही कंम्प्युटर बंद करुन ठेवले आहे.
          मित्राांनो,  मुलाला कंम्प्युटरवरील काहीही येत नसेल तर तो गेमच खेळेल ना? म्हणून त्याला किमान पेंट शिकवा, नोटपॅड वर्डपॅड शिकवा तर मुलगा गेम ऐवजी या बाबींचा सराव करेल. आणि गेम खेळणंही काही वाईट नाही बरं का? मित्रहो, गेम म्हणजे ॲनिमेशन असते. कागदावर काढलेल्या चित्राांना कार्टून सवरुपात धावायला लावणे ही ॲनिमेशन सॉफ्टवेअरची कमाल आहे. त्याला ह्या गोष्टींची जाणीव करुन द्या. गेम खेळता खेळता त्याची Visualization शक्ती वाढेल. म्हणून मर्यादित प्रमाणात जाणीव पूर्वक मुलांना कंम्पयुटर शिकवा. नाहीतर या क्षेत्रााबद्दल त्याच्या मनात अरुची निर्माण होईल. पुढे जाऊन आपण त्याच्याकडून सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याची अपेक्षा ठेवू  हा मात्र विरोधाभास असेल. 
    वर मी म्हटले की, पेंट,वर्डपॅड,नोटपॅड शिकवा. ह्या गोष्टीत तो रस घेऊ लागला तर आपरेंटींग सिस्टीम शिकवा. एम.एस.आफीस शिकू द्या. कोणतीही नविन गोष्ट आपला मेंदू स्टेप बाय स्टेप स्वीकारत असतो. म्हणून जास्त काळजी करु नका. 7 वी 8 वी पर्यंत एवढ्या साफ्टवेअरबद्दल शिकला तर 9 वी पासून त्याला सी लँग्वेज शिकवायला काही हरकत नाही. लहानपणापासून कोणताही अवेअरनेस नसल्यामुळे सी लँग्वेज शिकायला मुलांना एफ.वाय, एस.वाय. अशी दोन वर्ष द्यावी लागतात. जर 9 वी ते 12 वी पर्यंत सी आणि C++  लँग्वेज शिकला तर पुढे स्वत: प्रोग्राम बनवून लवकरच सॉफ्टवेअर बनवण्यात एक्पर्ट होईल. म्हणून रोज एक तास का असेना मुलांना 5 वी पासूनच कंप्युटर शिकवा.आणि तेही तुमच्या सहभागाने.
                                                                                    आपला दोस्त
                                                                                    पितांबर माळी 9890560476
   

      

No comments:

Post a Comment